Desi Jugaad : भंगारातील वस्तूंपासून बनवली चक्क ६ चाकी बाइक जबरदस्त जुगाड

Desi Jugaad : भंगारातील वस्तूंपासून बनवली चक्क ६ चाकी बाइक जबरदस्त जुगाड

 

 

 

Desi Jugaad : सोशल मीडियावर केव्हा कधी आणि काय व्हायरल होईल सांगता येत नाही. यात भारतासह परदेशातही देसी जुगाडचे अतरंगी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कोणी कारपासून हेलिकॉप्टर बनवत आहेत, तर कोणी विटांपासून कुलर तयार करत आहे. आता असाच एक नवा देसी जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका वृद्ध इंजिनियर काकांनी भंगारातील जुन्या पार्ट्स पाहून दोन, चार नाही तर चक्क सहा चाकी बाइक बनवली आहे. जी रस्त्यावर धावताना पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

 

व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती रस्त्यावरून ही अनोखी सायकल चालवताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील असून जिथे राहणाऱ्या एका वयस्कर इंजिनियर काकांनी ही बाईक बनवली आहे. गॅरेजमध्ये पडलेल्या जुन्या आणि वापरात नसलेल्या पार्ट्सच्या मदतीने त्यांनी ही ६ चाकी बाईक बनवली आहे. या बाईकला अगदी घोड्यासारखा आकार देण्यात आला आहे. या बाईकच्या मागे एक छोटी मशीन बसवण्यात आली आहे, जी इंजिनचे काम करते. ही बाईक त्याच इंजिनच्या मदतीने धावताना दिसत आहे. ही बाइक खूप संथ गतीने चालत असली, तरी रस्त्याने येणा-जाणारे लोक तिच्या उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत.

 

काकांनी जुगाडपासून बनवलेल्या या बाइकवर एक हँडलही फिक्स केले आहे, जे अगदी बाईकच्या हँडलप्रमाणे दिसत आहे. याशिवाय पाय ठेवण्यासाठी खाली एक नॉचही बनवण्यात आली आहे. या बाइकला चाकांऐवजी त्यांनी छोटे गोलाकार बॉल वापरले आहेत, ज्याच्या मदतीने ही बाइक पुढे जाते. ही अनोखी बाईक आता अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. ट्विटरवर @TansuYegen नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चीनमधील एका इंजिनियरने बंगारातील सामान गोळा करून हा मेकॅनिकल घोडा बनवला

आहे.

 

 

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada