Sanman dhan yojana कामगार धन योजनेअंतर्गत कामगारांना मिळणार दहा हजार रुपये..!

Sanman dhan yojana कामगार धन योजनेअंतर्गत कामगारांना मिळणार दहा हजार रुपये..

Sanman dhan yojana नमस्कार मित्रांनो सन्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये तर या संदर्भात जीआर सुद्धा आला आहे आणि याची संपूर्ण माहिती आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक साह्याबाबत.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008 च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्षे पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे.तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014 तसेच दिनांक 5 1 2023 व दिनांक 25 3 2023 अन्ननवे, राबविण्यात आलेल्या सन्मानधन योजनेच्या धरतीवर घरेलू कामगाराच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना राबविण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारतील होती.

मंडळातर्फे दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे निरपूर संबंधित योजनेअंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

१)यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील

2)लाभार्थ्यांना अर्थसाह्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत्व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी.

३)तसेच अर्थसाह्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावीत.

४)तसेच सदर अर्थसाह्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुख काम मार्फत कामगार उप आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसाह्याने वाटप करण्यात यावे.

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada