Desi Jugad | फक्त 5 मिनिटांत टाकीतला गाळ काढून टाका पाणी काढायची आणि उतरण्याचीही गरज नाही पहा उपयुक्त जुगाड.

Desi Jugad | फक्त 5 मिनिटांत टाकीतला गाळ काढून टाका पाणी काढायची आणि उतरण्याचीही गरज नाही पहा उपयुक्त जुगाड.

Desi Jugad: फक्त 5 मिनिटांत टाकीतला गाळ काढून

टाका पाणी काढायची आणि उतरण्याचीही गरज नाही पहा उपयुक्त जुगाड

नमस्कार मंडळी, आज आम्ही तुम्हाला असा जुगाड दाखवणार आहोत ज्यामुळे टाकीत न उतरता किंवा पाणी न ओतून टाकता सुद्धा आपण गाळ काढून टाकू शकतो.

अवघ्या पाच मिनिटांत टाकी स्वच्छ करण्याचा हा उपाय कसा काम करतो

घरच्या नळाला पाणी येतं म्हणून ते शुद्धच असेल असा विश्वास ठेवणं म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखंच आहे.

नळाला पाणी चांगलं येतं, टाकी पण आपल्याच घरातील आहे पण त्या टाकीत जिथून पाणी येतं ते ठिकाण कसं आहे.Desi Jugad

आपण कुठे बघायला जातो? अनेकदा गढूळ पाणी टाकीत स्थिरावल्यावर वरती,

असणारं पाणी ही दिसायला स्वच्छ असतं पण त्यातही मातीचे – धुळीचे- चिखलाचे कण मिसळतातच ना? वारंवार गढूळ पाणी येत असल्यास टाकीत गाळाचाच वेगळा थर तयार होतो.

प्राजक्ता साळवे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्लास्टिकची जुनी बॉटल वापरून केलेला जुगाड दाखवला आहे.

आपल्याला तोंडाच्या बाजूने साधारण दोन बोटांइतकं (उभं) अंतर ठेवून बाटली कापायची आहे.

मग उरलेल्या बाटलीचा सुद्धा तुम्ही पेन स्टॅन्ड किंवा लहानसं रोप लावण्यासाठी उपयोग करू शकता.

त्यानंतर बाटलाच्या कापून घतलल्या भागाला खालू.. बारीक चिरा करायच्या आहेत. बाटली पातळ असल्यास तुम्ही कात्री वापरूनही या चिरा करू शकता.

येथे क्लिक करून जुगाड व्हिडिओ नक्की पहा.

(शक्यतो बाटली थोडी पातळच असुद्या) मग तुम्हाला एका साध्या तोटीमध्ये (पाईप) पीव्हीसीचा थोडा बारीक पाईप घालून त्याला एका बाजूने आपल्या बाटलीचं तोंड लावायचं आहे.

चिकटपट्टीने नीट बॉटल चिकटवून घ्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही पीव्हीसी पाईपचा तुकडा लावू शकता. एकदा जरी तुम्ही हे टूल बनवले तरी अनेक महिने वापरता येईल.

मग आता अखेरीस टाकी स्वच्छ करण्याआधी, बाटलीच्या तोंडाकडील भागातून पाणी भरायचे आहे.

अगदी दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजेच पूर्ण पाईप हा पाण्याने भरलेला हवा.

यामुळे बाटलीचं तोंड जेव्हा तुम्ही टाकीत टाकाल तेव्हा त्याच प्रेशर ने गाळ निघायला सुरुवात होईल आणि तोंडाने पाणी खेचण्याची गरज उरणार नाही.

बॉटलचं तोंड टाकात घाला आणि मग सपूर्ण टाकीत फिरवा. व्हॅक्युमप्रमाणे काम करणारं हे टूल काहीच वेळात गाळ असलेले पाणी बाहेर काढेल.

हे कामी करताना जे पाणी बाहेर पडणार आहे ते गढूळ असलं तरी आपण झाड-रोपांना देऊ शकता.

पाणी वाया न घालवता टाकी स्वच्छ करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सांगा.Desi Jugad

Leave a Comment


src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-8762335486858500" crossorigin="anonymous">

Close Help dada